----
स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना आपण साधारणपणे जागा, जमीन वा प्लॉट अथवा थोडीशी आवाक्यातील गुंतवणूक असेल तर फ्लॅटमध्ये गुंतवणूक करतो. या दोन्हींमधल्या गुंतवणुकीस चांगला परतावा हवा असेल तर खालील गोष्टींचे नियोजन केल्यास आपल्या प्रॉपर्टीचे ‘युएसपी’ आपणच वाढवू शकतो.
जागा वा जमीन
प्लॉट, जागा आणि जमिनीबाबत खालील काळजी घेता येईल.
योग्य लोकेशन
जागा जमिनीच्या बाबतीत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यात उत्तम असे लोकेशन खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे जागा असो वा जमीन, आपण गुंतवणुकीच्या उद्देशाने घेताना लोकेशनला सर्वात आधी प्राधान्य दिल्यास भविष्यात हा दृष्टिकोन ङ्गायद्याचा ठरू शकतो. लोकशनच्या बाबतीत थोडासा दृरदृष्टीकोन बाळगल्यास वा थोडासा अभ्यास केल्यास ती गोष्ट निश्चितपणे ङ्गायद्याची ठरू शकेल यात शंका नाही.
आपण निवडत असलेली जागा, जमीन शहराच्या ज्या भागात आहे, त्या भागात येत्या काही वर्षात विकास कामांची काय स्थिती असणार आहे? हे अभ्यासून मगच लोकेशन ठरवा वा जागा-जमीन घेण्याचे निश्चित करा. एकदा विकास कामांनी गती घेतली की तुम्हाला प्लॉट, जागा-जमीन विक्री करताना चांगला परतावा निश्चितपणे मिळेल.
अपडेट विथ रेडी पेपर्स
घेतलेली जागा -जमीन आपण संपूर्ण संशोधनाअंती खरेदी करतो. त्यावेळी संबंधित जागेसंबंधाने आधी झालेल्या व्यवहाराबाबची माहिती गोळा करण्यासाठी झालेला त्रास लक्षात घेता, व्यवहाराच्या वेळी या धावपळीचा मोबदला म्हणून आपण जागा वा जमिनीची किंमत कमी करून मागण्याचा प्रयत्न करीत असतो. हा अनुभव लक्षात घेता आपण आधीच जर सर्व कागदपत्रे तयार ठेवली, रितसरपणे प्रत्येक वर्षीचा कर भरणे, जागा जमिनीचा सातबारा वा पीआर कार्ड आदी गोष्टी काढून ठेवल्या तर आपल्या प्रॉपर्टीची किंमत कोणीही कमी करून मागणार नाही.
सुरक्षितता
जागा, जमीन वा प्लॉटच्या संबंधाने सुरक्षितता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तिच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिल्यास तुम्हाला अधिकच्या रकमेचा दावा करता येणे शक्य आहे. अतिक्रमण असेल, वा त्याची सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर कुठलीही समस्या. आपल्या जागा, जमीन किंवा प्लॉटची मोजणी करून तिला तारेचे ङ्गेनसिंग करून घ्या. जेणेकरून खरेदीदारास जागा दाखविताना तो त्याला अधिक विश्वासार्ह व्यवहार वाटेल. त्याही पुढचा एक भाग म्हणजे त्या जागा, जमीन वा प्लॉटवर एक बोर्ड लिहून आपले नाव, सर्व्हे नं, दूरध्वनी क्रमांक इतर आवश्यक माहिती लिहिल्यास अधिक चांगले.
ओपन ङ्गॉर ऑङ्गर
जागा, जमीन वा प्लॉटबाबतीत व्यवहार करताना आपण समोरून येणार्या ऑङ्गर्सच्या बाबतीत सर्व पर्याय खुले (ओपन) ठेवा. त्यामुळे व्यवहार आणखी सोपा व ङ्गायद्याचा होण्याची शक्यता अधिक आहे. जागा, जमीन वा प्लॉटच्या बाबतीत एक्सचेंज ऑङ्गर असेल वा इतर कोणती ऑङ्गर असल्यास नेमक्या कोणत्या व्यवहारात आपला ङ्गायदा अधिक आहे किंवा कोणत्या व्यवहारात आपण गुंतवणूक केलेली रक्कम चांगल्या परताव्याच्या रूपाने मिळेल, त्याचे गणित मांडून ती ऑङ्गर स्वीकारा. सध्या प्लॉटच्या बदल्यात फ्लॅट तसेच जमीनीच गुंतवणुकीसाठी संयुक्त भागीदारी असे अनेक पर्याय हाताळले जाताना दिसतात.
घर अथवा फ्लॅट
घर वा फ्लॅटच्या बाबतीत हे नियोजन थोडेसे किचकट आहे. कारण इथे मिळणारा परतावा आवाक्यात असला तरी त्यात एक निश्चिंती आहे. इथे फ्लॅटच्या बाबतीत विक्रीचा व्यवहार शिवाय फ्लॅट भाड्याने देण्याचा आणखी पर्याय आहे. ज्यातून तुम्हाला त्या मालमत्तेमधून निश्चित असे उत्पन्न मिळणार आहे.
कलरिंग
साधारणपणे प्रत्येक वेळी घर नव्याने भाड्याने देताना वा ते विक्री करतानाएक गोष्ट आपल्याला प्राधान्याने करावी लागते ती म्हणजे त्या घर व फ्लॅटला नव्याने रंगरंंगोटी करून द्यावी लागते. याआधारावर विक्री वा भाड्याने देताना अधिकच्या रकमेची मागणी करू शकतो.
अपडेट विथ रेडी पेपर्स
आपण खरेदी करीत असलेले घर वा फ्लॅटच्या ‘सर्च टायटल रिपोर्ट’ व इतर कागदपत्रांची माहिती तज्ज्ञांच्या मदतीने घेण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. तेव्हा आपण फ्लॅट किंवा घर विक्री करणार असाल तर खरेदीदारांची ही नवी मानसिकता लक्षात घेता आपण आधीच जर सर्व कागदपत्रे तयार ठेवली तर आपला किंमतीबाबतचा दावा आणखी सक्षमपणे मांडू शकू. सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याबरोबरच घर वा फ्लॅटसंबंधातील सर्व करांचा भरणा करून झालेला कधीही चांगलाच.
पार्किंग
आजकाल फ्लॅटखरेदीसाठी आलेला प्रत्येकजणांचा पहिला प्रश्न असतो की, पार्किंगची काय सोय आहे? आपल्याकडे स्वतंत्र पार्किंग असल्यास ती जागा वेगळ्या रंगांच्या पट्ट्यांनी आखून घेता येईल व ती त्यांना दाखविता येईल. जेणेकरून एक मोठा प्रश्न मार्गी लागेल. पार्किंगबाबतची निश्चिंती झाल्यास आपण अर्धी लढाई जिंकली असे समजण्यास काहीच हरकत नाही. त्या पार्किंगबाबतचे असलेली कागदपत्रे सुद्धा आवश्यकता भासल्यास खरेदीदारास दाखविता येऊ शकतात.
सोसायटी - नातेसंबंध आणि प्रतिमा
सोसायटीमधील तुमची इमेज (प्रतिमा) तुमच्या विक्रीच्या व्यवहारात मोठी मदतीची ठरू शकते. ही साधारणपणे एक गोष्ट आहे, आपण ज्या सोसायटीत फ्लॅट घेणार आहोत, वा घर घेणार आहोत तिथे जाऊन अथवा तिथल्या संपर्क काढून खरेदीदार चौकशी करतो.
ही चौकशी करताना ती व्यक्ती व्यवहाराला कशी आहे? इथे राहताना त्यांना इतरांशी कसा संपर्क होता? आदी विविध प्रश्न व चौकशींमधून तो व्यवहारासाठीची पार्श्वभूमी बनवीत असतो. तेव्हा सोसायटीमधील किमान आपला संपर्क व प्रतिमा चांगली ठेवणे गरजेचे आहे. तसेच सोसायटीविषयक सर्व कर व प्रक्रियांचा निपटारा केलेला अधिक चांगला. ह्या गोष्टी आपल्या मालमत्तेची किंमत निश्चितपणे वाढवतील.
गो विथ ग्रीन
फ्लॅटच्यासंबंधाने ङ्गार कमी वेळा पण घराच्या किमंतीत बाबतीत एक गोष्ट निश्चितपणे तुमच्या मालमत्तेची किंमत वाढविणारी ठरेल ती म्हणजे घरासमोर, घराभोवती असलेली हिरवाई. घरासमोर वा मागे बाग असल्यास ती हिरवाई तुमच्या घरांची मोल वाढवतेच.
तिथे परिसरात, आजूबाजूला झाडी असल्यास दुधात साखरच म्हणा ना! यासोबतच पर्यावरणपूरक सोयी- सुविधा जसे की, सोलर सिस्टिम, सांडपाणी व्यवस्थापन व रेनवॉटर हार्वेस्टिंग अशा गोष्टी उपलब्ध असतील तुमची मालमत्ता चांगला परतावा देऊ शकेल यात तिळमात्रही शंका नाही.
या सर्व गोष्टीं सोबत आपल्या मालमत्तेच्या व्यवहारात आपल्याला अपेक्षित असलेल्या ‘गणिता’सह ‘अप्रोप्रिएट डील’ तर हवेच... तेव्हा तुम्हीच तपासून पाहा तुमच्या प्रॉपर्टीजच्या युएसपीज्!

No comments:
Post a Comment