भरभक्कम वेतन मिळविणार्या तरुणांची संख्या पुण्यासह राज्यात दिवसागणिक वाढतेच आहे. हाती पैसा खेळायला लागला की, मोठी स्वप्न बाळगलेल्या स्वप्नांसाठीचे पंख आणखी बळकट बनतात...मात्र सध्याचा सोन्याचे पडणारे भाव आणि काही प्रमाणात आवाक्यात असलेले घरांचे भाव लक्षात घेता, कोणती गुंतवणूक फायद्याची ठरेल..? सोनं खरेदी करावं की, सोन्यासारखं घर? असा प्रश्न सामान्य खरेदीदार वा गुंतवणूकदारांसमोर असलेला दिसतो आहे. मात्र अखेरीस सोन्यासारखं घरचं उत्तम म्हणावं लागेल...
साधारणपणे पाडव्यानंतर सोन्याचे भावाने मोठी गटांगळी खाल्ली. ही पडझड अवाक करणारी होती. युरोपीय राष्ट्रांमधील आर्थिक परिस्थिती व ती सुधारण्यासाठी घेण्यात आलेल्या संबंधित राष्ट्रांच्या शासनाच्या निर्णयाचा परिणाम म्हणून सोन्याच्या भावाने गडांगळी खाल्ली. मात्र सोनेविक्रीचा केवळ निर्णय जाहीर केला आहे, तर ही स्थिती आहे... ज्यावेळी नेमकी कृती घडेल त्यावेळी काय परिस्थितीचा सामना करावा लागेल...? याबाबत आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी वेगवेगळे विचार मांडत असली तरी, त्यावेळी काय होईल ते, येणारा काळच ठरवेल.
1) सहजयोगाने होणारी गुंतवणूक
2) जाणीवपूर्वक केली जाणारी गुंतवणूक
ढोबळपणे ह्या दोन प्रकाराने आपण गुंतवणूक होताना दिसते -
लोक सर्व साधारणपणे सोने, चांदी. मुदतठेवी, भविष्य निर्वाह निधी आदी बाबींमध्ये गुंतवणूक करतात. त्याही पुढे जाऊन काही अंशी लोक म्युच्युअल फंड व शेअर बाजारामधील गुंतवणूक करतात. मात्र तुम्ही ही जाणीवपूर्वक गुंतवणूक करीत असाल वा करणार असाल तर गुंतवणुकीचे नवे पर्याय शोधायला हवेत ना ?
गुंतवणूक कशात करावी?
सध्या आपल्यासमोर गुंतवणुकीसाठीचे पर्यायही खूप आहेत. आज घडीला सोन्याचे भाव खाली उतरल्याने आपण त्याच्यातील गुंतवणूकीचा विचार मनात येतो. वा आपण सोनेखरेदीसाठी रांगेत जाऊन उभे राहतो. सोने, चांदी, या पारंपरिक तसेच अनिश्चितता व धोका असणारी शेअर बाजारमधील गुंतवणूक म्हणता येईल. सोने-चांदी मधील गुंतवणूक आपल्या देशात केवळ पारंपरिक गुंतवणूक नाही तर ती भावनिक गुंतवणूक आहे. याजोडीला पीपीएफ, मुदतठेवी आहेतच...मात्र या सर्वांमध्ये परताव्याची हमखास हमी कोणताही पर्याय देईलच असे नाही, असली तरी ती नाममात्रच.
याउलट घर वा रिअल इस्टेट क्षेत्राचा विचार केला तर आज काही शहरांमध्ये वा विकसित शहरांमध्ये भाव काही अंशी वाढणं थांबलेलं असलं तरी त्यात वाढही निश्चितपणे होताना दिसणार आहे. त्यातही टू टायर व थ्री टायर सिटीजमधील विकास प्रक्रिया लक्षात घेता तिथेही गुंवणूकीला चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक आहे. ज्यामध्ये पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आदी शहरांचा समावेश करता येईल.
विशेष म्हणजे या क्षेत्रात गुंतवणूक तुमच्याकडे पर्यायही पुरेसे आणि चांगले आहेत. ज्यात, जागा, जमीन, प्लॉट व फ्लॅटमधील गुंतवणूक यांचा समावेश होऊ शकतो. ज्याला आपण ‘रिअल इस्टेट’मधील गुंतवणूक म्हणतो. यात आणखीही थोडीशी अधिकची जोखीम असेलले पर्याय देखील उपलब्ध आहेत. साहजिकच अशी अधिकची जोखीम असलेल्या गुंतवणुकीत फायदाही अधिकच मिळताना दिसेल.
जोखीम आहे अन् फायदाही...
गुंतवणूक कुठे करावी यासाठी ‘व्हीजन‘च हवे. सद्य स्थितीत सोने आणि चांदीमधील गुंतवणूक निर्णय सर्वांना परवडेलच अशी नाही. त्यातही ती बाळगणे देखील एक ‘जोखीम‘च होऊन बसलेली आहे. सुरक्षेसंबंधाने असलेले पर्याय सर्वांनाच पुरेसे ठरतील असेही नाही. मात्र गुंतवणूक कोणती तर ती ‘रिअल इस्टेट‘मधील जागा, जमीन, प्लॉट व फ्लॅटमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. यासंबंधाने जागा, जमीन, प्लॉटमधील गुंतवणुकीसाठी कधी-कधी जोखीम घ्यावी लागते. मात्र त्यात उत्तम परतावा मिळण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे.
या सर्व गुंतवणुकीमधील परताव्याचा विचार करता रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देऊ शकतो. त्यात जोखीमही तशीच आहे. प्लॉटपाठोपाठ, फ्लॅट व कमर्शिअल जागेतील गुंतवणूक देखील चांगला परतावा देऊ शकते. त्यापाठोपाठ सातत्याने पण तुलनेने कमी परतावा देणारी गुंतवणूक म्हणजे फ्लॅट भाड्याने देण्याचा पर्याय. मात्र ही गुंतवणूक कुठे करायची आणि किती करायची ही गोष्ट मात्र गरजेप्रमाणे आणि व्यक्तिगत आहे.

No comments:
Post a Comment