जागतिक आर्थिक परिस्थिती, अमेरिकेतील
बेरोजगारांच्या संख्येमध्ये झालेली लक्षणीय घट, भारतात विदेशी गुंतवणुकीचा कमी होत
असलेला ओघ यासह काही प्रमाणात चालू खात्यांमधील तुटीचा परिपाक म्हणून रुपयाने साठी
गाठली आणि ओलांडलीही... उद्योगधंदा, अर्थव्यवस्थेला याचा लक्षणीय प्रमाणात वाईट
अर्थाने सामना करावा लागत असला तरीही बांधकाम क्षेत्रासाठी मागणी घेऊन येणारी ही
घडामोड आहे. विशेष म्हणजे साधारणपणे मागील एक ते दीड वर्षानंतर बांधकाम क्षेत्रात
सकारात्मक हालचालीला कारण या निमित्ताने समोर आले आहे. मात्र ती हालचाल केवळ
अनिवासी भारतीयांच्या मालमत्ता खरेदीसाठीच्या चौकशीमुळे आहे.
नरेंद्र जोशी (narendrajoshisblog.blogspot)
हमखास आकर्षक परतावा म्हणून भारतीयांची सोने आणि घर गुंतवणुकीला नेहमीच पसंती राहिलेली आहे. असोचेमने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात निमशहरी भागातील अधिकधिक तरुणांनी सोन्यापेक्षा रिअल इस्टेटमधील पर्यायात गुंतवणुकीसाठी मोठा रस दाखविला आहे. यामागील कारण एकच, ते म्हणजे हमखास परताव्याची हमी. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूरसारख्या मोठ्या शहरांत तरुणांनी या मालमत्तेतील गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. अर्थात, असे मत नोंदविणारे तरुण हे त्यांच्या उत्पन्नातील एक भाग गुंतवणूक म्हणून ठेवण्यासाठी अधिक प्राधान्यक्रम देताना दिसत आहेत.
अर्थव्यवस्थेची वाटचाल बिकट असतानाही भारतीयांकडून ही गुंतवणूक विकून अधिकचा फायदा मिळविण्याचा प्रयत्न असतोच. ही मानसिकता पारंपरिक आहे. मात्र एक लक्षात घेतले पाहिजे, की सध्या सोन्याचे दर लक्षणीयरीत्या खाली येत आहेत. उलट मालमत्तांच्या किमतींचा स्तर कायम उंचावलेल्या स्थितीतच असलेला दिसतो आहे. ही बाब झाली ती देशातील तरुणांची. मात्र या अहवालात अनिवासी भारतीयांसंबंधाने सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांत तब्बल 51 टक्क्यांहून अधिक अनिवासी भारतीयांनी आता सोन्यापेक्षा बांधकाम क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य देण्याविषयीचे मत नोंदविले आहे. यावरून रुपयांच्या अवमूल्यनाचा फायदा ही मंडळी घेऊ इच्छितात, हे स्पष्ट आहे.
गडगडलेला रुपया
साधारपणपणे मागील काही महिन्यांपासून उतरणीला लागलेल्या रुपयाने 26 जून 2013 रोजी साठी पार करीत एकसष्ठी गाठली. मागील आठवड्यातच रुपयाचे हे मूल्य दिवसागणिक अधिक खालची पातळी गाठताना दिसले. वेळीच भारतीय रिझर्व्ह बॅंकेने हस्तक्षेप केल्याने ही पडझड आवाक्यात आली. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांवर होताना दिसतो आहे. देशी व्यवस्थेमध्ये इंधन दरवाढीपासून ते रोजच्या गरजेच्या वस्तूंची भाववाढ ही अटळ आहे. या सर्वाचा घरांच्या किमतीवर परिणाम होताना दिसेल, अशी भीती क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.
पडझडीचा परिणाम
प्रमुख जागतिक चलनाबरोबची डॉलरची पातळी मागील तीन वर्षांच्या उच्चांकावर असल्याने हे चित्र समोर आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत 62 रुपयांपर्यंत घसरेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे सीआयआय या उद्योगजगतातील राष्ट्रीय स्तरावरील संघटनेने रुपयाचा प्रवास हा 59 रुपयांच्या खालीच राहील, असे भाकीत व्यक्त केले आहे. संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी 56 टक्के उद्योजकांनी चालू खात्यातील वाढती तूट आणि रखडलेली विदेशी गुंतवणूक यामुळे या चालू तिमाहीतही रुपयाचा प्रवास 59 रुपयांच्या खालीच राहील, असा तर्क नोंदविला आहे.
बांधकाम क्षेत्राची स्थिती
मंदीची परिस्थिती आहे. घराच्या खरेदी-विक्रीवर याचा परिणाम झालेला असला तरी मागील चार वर्षांत राज्यातील नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई परिसरातील मालमत्तांनी 75 ते 65 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. महानगराच्या उंबरठ्यावर असलेल्या दुसऱ्या मोठ्या पुणे शहराने याबाबत 45 टक्क्यांच्या परताव्यासह प्रमुख शहरांमध्ये सातव्या स्थानावर बाजी मारली आहे. असे असताना या क्षेत्राच्या उभारीसाठी, घरांच्या मागणी आणि प्रत्यक्षातील व्यवहारासाठी सध्या काहीसे सकारात्मक वातावरण तयार होताना दिसते आहे, असे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ व व्यावसायिक सांगत आहेत.
बांधकाम क्षेत्रासाठी आशादायी
एरवी कमी किमतींमुळे येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या अनिवासी भारतीयांची उत्सुकता "हॉट प्रॉपर्टी' म्हणून ओळख असलेल्या दुबईकडे ओढा अधिक वाढलेला दिसून येतो आहे. 2008-09 च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर 2012 मध्ये प्रथमच येथील दर सुधारू लागले आहेत. दुबई लॅंड डेव्हलपमेंट ऍथॉरिटीच्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये या क्षेत्रातील व्यवहार आठ टक्क्यांनी वाढल्याची नोंद आहे. अमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक संकटानंतर भारतातील प्रमुख शहरातील मालमत्तांच्या किमती 40 ते 42 टक्क्यांनी वाढल्या आहेत, असे जॉन्स लॉंग लासेले इंडियाचे संशोधन प्रमुख आशुतोष लिमये यांचे मत आहे.
हीच ती संधी
रुपयाची ही सर्व पडझड दुर्दैवी आणि सामान्य भारतीयांवर महागाईचा बोजा वाढविणारी आहे. मात्र अनिवासी भारतीयांसाठी ही लाख मोलाची संधी आहे, असेच म्हणावे लागेल. कोणतीही अनिवासी भारतीयाची आपल्या मायभूमीशी नाळ जोडलेली असतेच. हे नाते भावनिक व व्यावसायिक पातळीवरही असलेले दिसते. त्यात भावनिक नात्यांची वीण अधिक घट्ट असलेली जाणवेल. स्थिती कोणतीही असेल, मात्र अनिवासी भारतीयांकडून सुरक्षित गुंतवणुकीचा विचार आला की मायदेशातील गुंतवणुकीलाच अधिक प्राधान्य दिले जाते, यात शंकाच नाही. हा गुंतवणुकीचा विचार करता वाढत जाणारे रुपयाचे अवमूल्यन अनिवासी भारतीयांना ही गुंतवणुकीची अ मिलियन डॉलर ऍपॉर्च्युनिटी (लाख मोलाची संधी) असणार आहे. या संधी मरगळ आलेल्या बांधकाम क्षेत्राला बाजारात थोडीशी का होईना, सकारात्मक हालचालीसाठी कारणीभूत ठरेल, अशी आशा आहे. मात्र ही आशा अनिवासी भारतीयांच्या कृती व निर्णयातूनच फळाला येणार आहे.

No comments:
Post a Comment